अमेरिकेत आल्यापासून अनेक वर्षे ऐकत आलो होतो, की या देशाचा पसारा खूप अफाट आहे… पहिल्या काही वर्षातल्या देशांतर्गत प्रवासामुळे तशी थोडी कल्पना होतीच. पण स्वतः रस्त्याने हा देश पादाक्रांत करण्याचा दुर्मिळ अनुभव घ्यायची संधी काही दिवसांपूर्वीच ईशिता व मला मिळाली. त्याचेच हे प्रवासवर्णन…
PhD नंतरच्या ह्या स्थलांतरासाठी ईशान्येत असलेल्या न्यूयॉर्क राज्यातील इथाका मधून कॅलिफोर्नियात फोल्सम येथे जाण्याचा आमचा प्रवासाचा मार्ग काहीसा या नकाशाप्रमाणे होता :
या नकाशाबरोबरच आमच्या प्रवासातील काही आकडे बघून अमेरिकेच्या अफाट पसाऱ्याचा अंदाज येईल: एकूण प्रवासाचे अंतर : ३४२६ मैल (~ ५५०० कि. मी.)! १३ राज्यातून प्रवास. आम्ही हा प्रवास ८ दिवसात पुरा केला. त्यात २ दिवस स्थलदर्शन ही होते.
अमेरिका देशाची १७७६ साली जेव्हा स्थापना झाली, तेव्हा (सध्याच्या) पूर्व व ईशान्य अमेरिकेतील १३ राज्यंच अमेरिकेत होती. पुढच्या सुमारे ७५ वर्षात अमेरिकेने बाकीचा भूप्रदेश संपादित केला. ह्या इतिहासाचा एक परिणाम असा की पूर्व व ईशान्य अमेरिका सोडता बाकीचा संपूर्ण देश अतिशय विरळ वस्ती असलेला आहे. कारण देशाच्या या भागांमधे खूप उशिरा स्थलांतर झाले. शिवाय जे American Indian लोक इथे हजारो वर्षे राहत होते, त्यापैकी बहुतांश लोक मारले गेले. या विरळ वस्तीची जाणीव प्रकर्षाने होते हा प्रदेश रस्त्याने ओलांडूनच… अमेरिकेत अनेक लोक असा प्रवास करतात. तो मुख्यत: शक्य होतो तो अमेरिकेतील अतिशय उत्तम महामार्गांमुळे. या रस्त्यांवरील वेगमर्यादा ताशी ६५ ते ८० मैल (१०० ते १३० कि. मी ) असल्याने एवढी प्रचंड अंतरे मर्यादित वेळेत कापली जातात. अर्थात या उत्तम महामार्ग व्यवस्थेचा तोटा म्हणजे इथे public transport चा अजिबात विकास झाला नाही. त्यामानाने भारताने स्वातंत्र्यानंतर फक्त ६०-७० वर्षात रेल्वे व बसमार्गाचे जाळे देशाच्या अगदी कोपऱ्या-कोपऱ्यापर्यंत पोहोचवले आहे.
प्रवासाचे ढोबळमानाने नियोजन करून आम्ही इथाकाहून माझ्या सर्व सामानासकट (विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर घेऊन) प्रयाण केले.
पहिला दिवस:
अजून एक नवीन अनुभव म्हणजे time-zones रस्त्याने ओलांडणे. एरवी विमान प्रवासानंतर घड्याळ पुढे-मागे करायची सवय होती, पण रस्त्याने जाताना घड्याळ adjust करायची वेळ अजून आली नव्हती. त्याचा एक परिणाम असा की आम्ही पश्चिमेला जात असल्याने जेव्हा जेव्हा time-zones ओलांडले, त्या दिवशी प्रवासासाठी एक तास जास्त मिळाला :) शिकागोत रात्रीचे जेवण वगैरे करून विश्रांती घेतली.
दुसरा दिवस:
शिकागो शहर व मिशिगन सरोवर |
तिसरा दिवस:
चौथा दिवस:
पाचवा दिवस:
या भागात उन्हाळा जास्तच जाणवत होता आणि A.C. काम करत नसल्याने तापमान अजूनच त्रासदायक होत होते. तोपर्यंत जरी तापमान ठीक असले तरी पुढे Nevada व California च्या त्रासदायक गर्मीचा धसका घेऊन आम्ही याच दिवशी वाटेत गाडीचा A.C. शक्यतो repair करण्याचे ठरविले. सुदैवाने वाटेत Montana च्या Billings शहरात एक mechanic मिळाला ज्याने A.C. तात्पुरता rapair करून दिला आणि आमची पुढच्या प्रवासाची सोय केली… ☺ त्या दिवशी आम्ही जवळजवळ ८०० कि. मी. प्रवास करून Montana-Wyoming सीमेवरील Gardiner या डोंगराळ गावी पोचलो. Gardiner हे गाव प्रसिद्ध Yellowstone National Park या उद्यानाच्या सीमेवरच आहे. पुढच्या दिवशीच्या Yellowstone भ्रमंतीची चौकशी करून आम्ही विश्रांती घेतली. त्यादिवशी hotel room मधून दिसणारे Yellowstone नदीचे दृश्य अप्रतिमच होते.
सहावा दिवस:
या उद्यानाची सफर आम्ही सुरु केली "Mammoth hot springs" पासून. इथल्या भूगर्भामध्ये magma (द्रवरूप खडक)
Grand Prismatic Spring |
Yellowstone चे दुसरे आकर्षण म्हणजे इथले वन्यजीवन. ते आम्हाला इथे अगदी भरभरून दिसले. उद्यानाच्या पर्यटक केंद्राच्या बाहेरदेखील Mule deer चा कळप होता. Bison (रानरेडे) तर अगदी सर्वत्र. अधून मधून हरणं, लांडगा (इथला Coyote) ह्यांचे ही दर्शन झाले. एवढेच नव्हे तर एक अस्वल ही तळ्यातून आंघोळ करून बाहेर पडताना दिसले.
पण दिवसाचा शेवट होता Yellowstone मधील Old faithful हा गरम पाण्याचा फवारा बघणे. इतर कुठल्याही उष्ण पाण्याच्या झऱ्याप्रमाणे असलेल्या या Old Faithful मधे मात्र आत निमुळती जागा तयार होते, ज्यामुळे पाणी काही काळ रोखले जाउन त्याची वाफच बाहेर फवाऱ्यासारखी फेकली जाते. दर दीड तासाने होणारा हा फवारा जवळजवळ २ मिनिटे चालतो व जवळ जवळ १०० ते १५० फूट उंच उडतो.
सातवा दिवस:
Elk या हरिणासारख्या पण घोड्याएवढ्या मोठ्या प्राण्याचेही दर्शन झले. नर Elk ची एवढी मोठी शिंगं पहिल्यांदाच बघितली. आदल्या दिवशीप्रमाणेच खूप रानरेडे ही दिसले.
निसर्गसौंदर्याने गच्च भरलेल्या या प्रदेशात वेळ असेल तर आठवडा देखील कमी पडेल. पण वेळेअभावी शेवटी या सुंदर जागेचा निरोप घेऊन आम्ही Idaho राज्याकडे कूच केले. Yellowstone व Grand Teton चा बराचसा भाग Wyoming राज्यात आहे. तो मागे सोडून एक खिंड पार करून आम्ही पुन्हा एकदा मैदानी प्रदेशात Idaho मध्ये प्रवेश केला. एकूण सुमारे ५०० कि. मी. प्रवास करून आम्ही Pocatello नावाच्या गावात मुक्कामाला पोहोचलो .
Elk |
आठवा दिवस:
बाकी काही plan नसल्याने असाच लहरी detour घेऊन आम्ही Idaho च्या Twin Falls शहराजवळ पोचलो. नावाप्रमाणेच हे शहर धबधब्यासाठी प्रसिद्ध आहे. इथल्या Shoshone Falls ला Niagara of the west असे संबोधले जाते. या Shoshone Falls ला भेट देऊन आम्ही तिथल्या सृष्टी सौंदर्याचा आस्वाद घेतला. उन्हाळ्यामुळे पाणी जरी कमी असले तरी त्याच्या विशाल आकाराची कल्पना तरी नक्कीच आली.
यानंतर मात्र आमच्या प्रवासातील बाकीचे अंतरात गाडीतूनच बाहेरचे दृश्य बघितले. त्याचे कारण गाठायचा पल्ला ही मोठा होता, व मधल्या नेवाडा राज्यात अफाट मोकळ्या जमिनीपेक्षा अक्षरशः काहीही दिसत नाही. अशाच वेळी देशाच्या त्या "पसाऱ्या"चा आणखी चांगला अनुभव येतो. नेवाडा पार करून आम्ही California राज्यात प्रवेश केला तो पुन्हा Sierra Nevada डोंगररांगेतून. आमचे शेवटचे गंतव्य स्थान फोल्सम इथून फार लांब नव्हते व संध्याकाळी ८. ३० च्या सुमारास जवळ जवळ ११०० कि.मी. अंतर पार करून आम्ही आमचा प्रवास संपविला.
या आठ दिवसात अमेरिकेच्या विविध भौगोलिक प्रदेशांची, हवामानाची, खाण्याची, संस्कृतीची, राहणीमानाची, वन्यजीवनाची वेगळ्या प्रकारे ओळख झाली. आधी म्हणल्याप्रमाणे देशाच्या पसाऱ्याचा अंदाज आला. भारतात जम्मू तवी ते कन्याकुमारी (हिमसागर एक्स्प्रेस) हा प्रवास मला कितीतरी दिवस करायचा असूनदेखील संधी मिळाली नव्हती. तो प्रवास कसा असेल याची कल्पना मला या प्रवासाने आली. यापुढे अशा प्रकारच्या कुठल्याही प्रवासाची संधी (भारतात किंवा बाहेरही) मिळाली तर मी एका पायावर तयार असीन! ☺
- मिहीर